Raksha Bandhan Boycott: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा (Aamir Khan) चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) आणि अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहेत. एकीकडे आमिर खान आणि करीना कपूरच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंडला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे, रिलीजच्या अवघ्या एक आठवडा आधी, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि भूमी पेडणेकरचा (Bhumi Pednekar) 'रक्षा बंधन' चित्रपटही वादात अडकला आहे. आता अक्षयच्या या चित्रपटावरही बंदी घालण्याची मागणी होत आहे. बॉयकॉट 'लाल सिंह चड्ढा'नंतर आता ‘बॉयकॉट रक्षाबंधन’ अशी मागणी नेटकरी करत आहेत.


लेखिका कनिका ढिल्लन ही या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या मागणीचे एक कारण आहे. ‘रक्षाबंधन’च्या निमित्ताने लेखिका कनिका ढिल्लनचे अनेक वर्षे जुने ट्विट व्हायरल होत आहेत. तेव्हापासून लोक त्यांना हिंदुविरोधी म्हणत आहेत. लोक कनिकावर हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्याचा आरोप करत आहेत. यानंतर ‘रक्षाबंधन’वर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


नेमकं कारण काय?


अक्षय कुमार स्टारर ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची स्क्रिप्ट कनिका ढिल्लनने लिहिली आहे. लेखकीचे हिंदूफोबिक ट्विट समोर आल्यापासून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. लेखिकेचे अनेक ट्विट समोर आले आहेत, ज्यात तिने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तिचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी असे म्हटले की, कनिकाने वारंवार हिंदू श्रद्धा आणि धार्मिक भावनांवर आघात केला आहे, त्यामुळे तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला पाहिजे.


नेटकरी संतापले


कनिकाच्या जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत एका यूजरने लिहिले की, 'आम्ही रक्षाबंधन या चित्रपटाची लेखिका कनिका ढिल्लनवर बहिष्कार टाकू. तुम्ही त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट पाहू शकता. सर्वांनी रक्षाबंधनवर बहिष्कार टाका.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही हिंदू परंपरांच्या विरोधात आहात आणि रक्षाबंधनसारख्या चित्रपटावर काम करत आहात. तुम्हाला हिंदू परंपरा दाखवून पैसा हवा आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही हिंदू परंपरांचा द्वेष करता.’


पाहा ट्वीट्स





आमिर खान आणि अक्षय कुमार येणार आमने-सामने


अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान 11 ऑगस्टलाच आमिर खान आणि करीना कपूरचा बहुचर्चित 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. आधी हा चित्रपट 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण काही कारणांमुळे चित्रपटची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 11 ऑगस्टला आमिर खान आणि अक्षय कुमार आमने-सामने येणार आहेत.


हेही वाचा :