मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे सिनेमे हा कोटीच्या कोटी उड्डाणं घेतात. पण तरीही सिनेमांनी जास्तीत जास्त कमाई करावी यासाठी आता खुद्द सलमानंच नवा फंडा सांगितला आहे.

 

चित्रपटांची जास्तीत जास्त कमाई व्हावी यासाठी तिकीटांचे दर कमी आणि सिनेमागृहांची संख्या जास्त असायला हवी असं सलमानला वाटतं.

 

सलमान म्हणाला की, 'जर आपण आता आपल्या सिनेमांच्या तिकीट दरावर लक्ष नाही दिलं तर, याचा सिनेमांना जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.'

 

सलमान म्हणाला की, 'दिवसेंदिवस सिनेमा बनवणं वाढत आहे. पण त्या तुलनेनं कमाईत घट होत आहे. मराठी सिनेमा 80 आणि 100 रुपयात 100 कोटींचा बिझनेस करीत आहेत.आणि आपण 250 रुपयांच्या तिकीटातही मोठ्या मुश्कीलने 100 कोटीपर्यंत मजल मारत आहोत.'

 

सलमानच्या मते देशभरात अजून 20 हजार सिनेमागृहांची गरज आहे.