मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीच्या वहिनीने तिला सासरच्या मंडळींकडून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. नवाझसह त्याच्या कुटुंबीयांनी आपण तीन महिन्यांची गरोदर असताना मारझोड केल्याचा दावा केला आहे.


नवाझुद्दीनने मात्र वहिनीचे आरोप धुडकावून लावले आहेत. केवळ सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने आणि आपल्यावर आरोप केल्याने प्रसिद्धीझोतात येण्याच्या इर्षेने वहिनीने आरोप केल्याचा दावा नवाझने केला आहे. नवाझुद्दीनचा धाकटा भाऊ मिनाझुद्दीनचा विवाह 31 मे 2016 रोजी झाला होता.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या जिल्हा अधीक्षकांकडे तिने तक्रार नोंदवली आहे. 28 सप्टेंबर रोजी नवाझने मारहाण केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. याचा बचाव करताना नवाझने सीसीटीव्ही फुटेज जारी केलं आहे. तिचे काकाच यामागे असल्याचं नवाझने म्हटलं आहे.