Nawazuddhin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) पत्नीने म्हणजेच आलियाने (Aaliya Siddhiqui) अभिनेत्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Continues below advertisement


आलियाने इस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये ती नवाजुद्दीनवर गंभीर आरोप करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती रडत म्हणत आहे. ती म्हणाली, "नवाजुद्दीन माझ्या लेकरांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आता मुलांचा ताबा हवा आहे. पण मला आता आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे". 


आलिया म्हणतेय,"नवाजला मुलांचा ताबा हवा आहे. पण आता मला जाणून घ्यायचं आहे की, नवाजने बाळंतपण अनुभवलेलं नाही. मुलं जन्माला आल्यानंतर त्यांची काळजी घेतलेली नाही. मुलांच्या डायपरची किंमत किती होती हेदखील त्याला माहित नव्हतं आणि आता त्याला मुलांचा सांभाळ करायचा आहे. तो एक चांगला वडील कसा आहे हे त्याला दाखवून द्यायचं आहे. पण मला वाटतं तो चांगला नाही तर तो भित्रा बाप आहे. आईपासून आपलं मूल हिरावून घेण्यासारखी वाईट गोष्ट काय असू शकते?" 






आलिया पुढे म्हणाली,"तू कधीच मला पत्नीप्रमाणे वागवलं नाहीस, पण तरीही मी नवरा समजून कायम तुझा आदर केला. आता मला पैशांची गरज आहे. न्यायलय निर्णय नेहमी सत्याच्या बाजूने निर्णय घेतं. त्यामुळे माझ्या बाजूने निर्णय लागेल यावर माझा विश्वास आहे". आलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे आणि त्याची पत्नी आलियाचे मतभेद सुरू आहेत. आलियाने नवाजुद्दीनवर अनेक आरोप केले आहेत. यात गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे अशा अनेक आरोपांचा समावेश आहे. 


आलियाने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"एक उत्कृष्ट अभिनेता स्वत:ला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता  त्याच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात पुराव्यासह बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. माझ्या लेकरांसाठी मी काहीही करायला तयार आहे. पण त्या दुष्ट माणसाकडे देणार नाही". 


संबंधित बातम्या


Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या मुलांच्या कस्टडीबाबत आलिया सिद्दीकीच्या वकिलांचा दावा; म्हणाले, "तो केवळ प्रोव्हायडर आहे म्हणून..."