Divya Bharti : बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) ही हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याचे चाहते जगभर होते. आज तिचा जन्मदिवस आहे. वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत 21 सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं होतं. तिची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत केली जाते.
दिव्या भारती यांनी डी. रामानायडू यांच्या 'बोबली राजा' या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून 1990 साली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिव्या भारती यांची क्रेझ पाहता बॉलिवूडच्या सिने-निर्मात्यांनीदेखील आपल्या सिनेमासाठी दिव्या भारतीसा विचारणा केली. त्यानंतर त्यांनी 1992 साली 'विश्वात्मा' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला नसला तरी या सिनेमाच्या माध्यमातून त्या रातोरात सुपरस्टार झाली. त्यानंतर त्या 'शोला और शबनम' या सिनेमात झळकली. हा त्यांचा पहिला बिग बजेट सिनेमा. त्यानंतर त्या दीवाना, जान से प्यारा, दिल आशना है, बलवान, दिल ही तो है, दुश्मन जमाना, गीतसारख्या सिनेमांत काम केलं.
मृत्यूच्या रात्री दिव्या भारतीसोबत काय घडलं?
5 एप्रिल 1993 रोजी दिव्या चेन्नईहून शूटिंग संपवून मुंबईत आली. दरम्यान मैत्रीण आणि डिझायनर नीता लुल्लाने त्यांना आगामी प्रोजेक्टबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलं. पण दिव्याने मुंबईतील तिच्या घरी बोलावलं. त्यानंतर नीता आपल्या पतीसह दिव्याच्या घरी गेली. दिव्या त्यांची मैत्रीण नीता आणि तिचा पती या तिघांमध्ये ड्रिंक्स घेत गप्पा रंगल्या होत्या. दरम्यान दिव्या अचानक रुमध्ये गेली. त्यामुळे नीता आणि तिचा पती टीव्ही पाहू लागले. त्यावेळी त्यांच्या घरी कामवालीदेखील होती.
दिव्याच्या रुममधील बाल्कनीला संरक्षक जाळ्या नव्हत्या. त्या खिडकीत नीट उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली पडली. दिव्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार बसला होता. त्यानंतर नीताने दिव्याला जवळच्या रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषिक केलं. दिव्याच्या मृत्यूप्रकरणाचा जवळपास पाच वर्ष मुंबई पोलीस तपास करत होते. अखेर बाल्कनीतून पडून दिव्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगून पोलिसांनी दिव्या भारती यांची केस क्लोज केली.
वयाच्या 18 व्या वर्षी अडकली लग्नबंधनात!
'शोला और शबनम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गोविंदाने दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांची भेट करुन दिली होती. त्यानंतर दिव्या आणि साजिद यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 10 मे 1992 रोजी ते लग्नबंधनात अडकले.
संबंधित बातम्या