मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव सात वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर बॉयफ्रेण्डसोबत विवाहबंधनात अडकली आहे. अमृता आणि आरजे अनमोल एका छोटेखानी सोहळ्यात लग्नबद्ध झाले.

 
आरजे अनमोलने त्याच्या फेसबुक आणि ट्विटर पेजवरुन ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 'सात वर्षांपूर्वी एक गोष्ट सुरु झाली... आणि ती सुरु राहील.. अधिकाधिक दृढ होण्यासाठी. आम्ही विवाहबद्ध झालो. मला आणि अमृताला तुमच्या शुभेच्छा हव्यात.'

 
34 वर्षांची अमृता राव सध्या 'मेरी आवाज ही पेहचान है' ही मालिका करत आहे. तिचे इश्क विष्क, दीवार, मै हू ना यासारखे चित्रपट प्रचंड गाजले होते.

 

https://twitter.com/rjanmol/status/731768134726619137