मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनतर आज पहिल्यांदाच नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आपल्या वकिलाने कोणत्याही चॅनेलशी न बोलण्याचा सल्ला दिल्याचंही सांगितलं आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मी दहा वर्षांपूर्वीही स्पष्टीकरण दिलं होतं. 10 वर्षापूर्वी जे बोललो होतो तेच खरं आहे. त्यात आज काय बदल होणार आहे? असा सवालही नाना पाटेकरांनी विचारला आहे.
माझ्या वकिलाने मला कोणत्याही चॅनेलशी बोलण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मी आता यावर काही बोलू इच्छित नाही. नाहीतर चार दिवस अगोदरच मी बोललो असतो. वेळ आल्यावर मी सगळ्यांशी एकत्र बोलेन, असंही नाना पाटेकरांनी स्पष्ट केलं आहे.
काय आहे प्रकरण?
बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण नुकतीच सांगितली. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. 'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं.
'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला. तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री म्हणाली होती.
2003 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'आशिक बनाया आपने' हा सिनेमा गाजल्यानंतर तिने चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीडसारखे काही सिनेमे केले. 2010 नंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण तिने यापूर्वीही नाना पाटेकरांबाबत घडलेला हा किस्सा अनेकवेळा सांगितला आहे.
दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यानतंर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं.
तनुश्री दत्ताचा आरोप
अनेक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की, "नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित आहे की, ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारला आहे."
'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला.
संबंधित बातम्या
तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग
राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता
तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया
तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला
बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला : नाना पाटेकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2018 05:10 PM (IST)
अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनतर आज पहिल्यांदाच नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आपल्या वकिलाने कोणत्याही चॅनेलशी न बोलण्याचा सल्ला दिल्याचंही सांगितलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -