12 जून रोजी 29 वर्षीय मॉडेल कृतिका चौधरी मुंबईतल्या अंधेरीत राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. घटना उघडकीस आल्याच्या दोन ते तीन दिवस आधी डोक्यावर जोरदार वार करुन तिला मारण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते.
शकील नसीम खान आणि बादशाह उर्फ बासूदास माकमलाल दास यांनी 8 जून रोजी रात्री सव्वादोनच्या सुमारास कृतिकाची हत्या केल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येईल. आरोपी शकीलला नवी मुंबईतील पनवेल, तर बादशाहला मुंबईतील गोवंडीतून अटक करण्यात आली.
दोघंही आधीपासूनच कृतिकाला ओळखत होते. कृतिकाने वर्षभरापूर्वी शकिलकडून ड्रग्ज विकत घेतले होते. त्याचे पैसे तिने अद्याप चुकते केले नव्हते. कृतिकाची हत्या झाली त्या रात्री पैशाच्या देवाणघेवाणीवरुन दोघांची तिच्याशी बाचाबाची झाली. त्यामुळे शकीलने तिची हत्या केली.