मुंबई: दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपात अभिनेत्री प्रीती जैन दोषी आढळली आहे. प्रीतीला तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालायने हा निर्णय दिला.


कोर्टाने अभिनेत्री प्रीती जैनसह तिघांना दोषी धरलं आहे.  तर गवळी टोळीतील दोघांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे.

प्रीती जैनने 2005 साली दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती.  त्याच प्रकरणात कोर्टाने आज शिक्षेची सुनावणी केली.

प्रीती जैनला सप्टेंबर 2005 मध्ये अटक झाली होती. त्यावेळी प्रीती जैनने मधुर भांडारकरांवर लैंगिक शोषणाचाही आरोप केला होता.  मात्र प्रीतीने मधुर भांडारकरांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना पैसे दिल्याचं सिद्ध झालं.

प्रीतीने मधुर भांडारकरला संपवण्यासाठी डॉन अरुण गवळीला सुपारी दिली होती. प्रीतीने सुपारीच्या रकमेपैकी 70 हजार रुपये, अरुण गवळीच्या हस्तकाकडे सोपवले होते. मात्र काम न झाल्याने ते पैसे परत मागितले.

मग गवळी टोळीने हे याबाबतची माहिती हस्तकांमार्फत पोलिसांकडे पोहोचवली आणि प्रकरणाला वाचा फुटली.

पोलिसांनी आठवडाभराच्या तपासानंतर 10 सप्टेंबर 2005 रोजी प्रीतीविरुद्ध खटला दाखल केला होता.