मुंबई: मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बाहुबली द कन्क्लुजन’ अर्थात बाहुलबलीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. देशभरात या चित्रपटाचा चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे.
बाहुबली पाहून आलेल्या सर्वच जण पैसा वसूल अशी प्रतिक्रिया देत आहेत.
बाहुबली -2चं पहिल्या दिवसांचं बुकिंग सगळीकडे हाऊसफुल्ल झालं. अनेक थिएटर्समध्ये पंधराशेपेक्षा अधिक किंमतीला तिकीट विक्री झाली.
दक्षिण भारतात तर 2400 रुपयांपेक्षा दरानं तिकीट विक्री झाली. दक्षिणेत तिकीटासाठी प्रेक्षकांनी सकाळी उठून 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लावल्याचं चित्र दिसलं.
इकडे महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा सर्वच शहरात या चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या रांगा पाहायला मिळतायेत. सकाळपासूनचे सर्वच शो हाऊसफुल झाल्याचं चित्रं आहे.
नाशिकमध्ये बाहुबली टी शर्ट
बाहुबली पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमा गृहात मोठी गर्दी केली आहे. नाशिकमध्ये बाहुबलीच्या चाहत्यांनी बाहुबलीचे शर्ट घालुन सिनेमा गृहात हजेरी लावली.
चंद्रपुरात जल्लोष
राज्याच्या कान्याकोपऱ्यात बाहुबलीला जोरदार प्रतिसाद मिळतोय. चंद्रपुरातही चाहत्यांनी ढोल ताशाच्या गजरात बाहुबली-2चं स्वागत करण्यात आलं.
पिंपरीत रांगा
तिकडे पिंपरी-चिंचवडमध्येही बाहुबली-2 पाहण्यासाठी चाहत्यांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. लहान थोरांसह सर्वच वयोगटातील प्रेक्षकांमध्ये बाहुबली पाहण्याची उत्सुकता दिसली.
हैदराबादेत प्रभासच्या पोस्टरला दुग्धाभिषेक
हैद्राबादमध्ये बाहुबली सिनेमाच्या चाहत्यांनी बाहुबली-2 अनोखं स्वागत केलं.. बाहुबली चित्रपटाचा नायक प्रभासच्या पोस्टरला चाहत्यांनी चक्क दुधाचा अभिषेक घातला. प्रभासच्या पोस्टरला मोठा हार घालत, बाहुबली-2चं जंगी स्वागत केलं.