मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानची पत्नी किरण रावच्या घरी चोरी झाली आहे. किरणच्या वडिलांनी 24 नोव्हेंबर रोजी खार पोलिस स्टेशनमध्ये या चोरीची तक्रार नोंदवली आहे.
तक्रारीनुसार, किरण रावच्या सुमारे एक कोटी रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. वांद्र्यातील कार्टर रोड इथल्या घरातून ही चोरी झाली आहे.
पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरु केला आहे. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिस सध्या किरण रावच्या घरी काम करणाऱ्या नोकरांची चौकशी करत आहेत.