Shilpa Shetty: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) घरात चोरी करणाऱ्या दोघांना मुंबई (Mumbai) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जुहू (Juhu) पोलिसांनी या दोन आरोपींना ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू आहे.
एका आठवड्यापूर्वी चोरीची घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. चोरांनी कोणत्या वस्तू चोरल्या आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलेला होता मात्र शिल्पा शेट्टी ही सध्या लंडनमध्ये असल्याने काय मुद्देमाल चोरीला गेले अजून स्पष्ट नाही.
शिल्पानं काही दिवसांपूर्वी तिच्या लंडन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. शिल्पानं तिचा वाढदिवस देखील लंडनमध्ये साजरा केला होता.
शिल्पा ही चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पाचा पती राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला 21 सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला.
शिल्पानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘बाजीगर’ हा शिल्पाचा पहिला चित्रपट होता. तर ‘धडकन’ या चित्रपटामुळे शिल्पाला विशेष लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी तिचा निकम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. शिल्पा ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. शिल्पाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
शिल्पाचे आगामी चित्रपट
लवकरच शिल्पा ही 'केडी द डेविल' (KD The Devil) या साऊथ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसह कन्नड सुपरस्टार ध्रुव सरजादेखील (Dhruva Sarja) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'केडी द डेविल' हा सिनेमा गॅंगस्टरवर आधारित आहे. हा सिनेमा कन्नडसह हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.