Multiplex Cinemas Ticket Prices: तुम्हाला जर मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघाचा असेल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता प्रेक्षक मल्टीप्लेक्समध्ये 100 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकणार आहेत, असं म्हटलं जात आहेत. यावर्षी चित्रपटगृहात रिलीज झालेले अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. या फ्लॉप चित्रपटांनी थिएटर मालक, चित्रपट निर्माते आणि वितरकांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे चित्रपटगृहांचे मालक चित्रपटांची तिकीटे कमी करण्याचा निर्णय लवकरच घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे. गेल्या महिन्यात, राष्ट्रीय सिनेमा दिनी, तिकिटाची किंमत 75 रुपये असताना 60 लाखांहून अधिक लोक सिनेमागृहात पोहोचले. त्यामुळे आता स्वस्तात चित्रपटाची तिकिटे देण्याचे निर्णय थिएटर्सचे मालक घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाच्या तिकिटांची किंमत आता 350-450 रुपये किंवा त्याहून अधिक आहे, शोच्या वेळा आणि इतर घटकांवर तिकीटांची किंमत अवलंबून असते. चित्रपट व्यापार विश्लेषकांचे मत आहे की, सामान्य प्रेक्षकांसाठी इतकी महाग तिकिटे खरेदी करणे खूप कठीण आहे. थिएटर ऑपरेटर आणि वितरक हे कमी आणि मध्यम बजेट असणाऱ्या चित्रपटाची तिकिटे स्वस्त करू शकतात. संध्याकाळ आणि रात्रीच्या शोची तिकिटे माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना केली जात आहे. तरुणांसाठी वीकेंडला काही आकर्षक ऑफर्स देखील दिल्या जाऊ शकतात.
थिएटरमधील महागड्या स्नॅक्सच्या ग्राहकांच्या तक्रारींनंतर खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या किमतीतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. एक प्रयोग म्हणून गेल्या आठवड्यात ब्रह्मास्त्र आणि चुप या चित्रपटांची तिकिटे 100 रुपयांना विकली गेली. आता अजय देवगणचा 'दृश्यम' हा चित्रपट 2 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे आणि त्यासाठी 2 ऑक्टोबरपासून ओपनिंग डे तिकिटांवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे. अमिताभ बच्चन स्टारर गुडबाय हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाचे तिकीट 150 रुपये असून शकते.
आयनॉक्स चीफ प्रोग्रामिंग ऑफिसर राजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, जास्त बजेटच्या चित्रपटांसाठी हे करणे शक्य नाही. पण ऑक्टोबरमध्ये रिलीज होणाऱ्या कमी बजेट असणाऱ्या चित्रपटांचे तिकीट दर जर कमी ठेवले तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: