मुंबई : देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहतासोबत 9 मार्च रोजी आकाश विवाहबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा झाला होता.
पुढील महिन्यात आकाशचा ग्रँड विवाह पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून लग्नाची जोरात तयारी सुरु आहे. नुकतंच मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचा विवाह पार पडला होता. त्यावेळी देशाभरातील दिग्गजांनी ईशाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
येत्या 9 मार्चला शनिवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सांयकाळी 7.30 वाजता हा ग्रँड विवाहसोहळा पार पडणार आहे. तर 11 मार्चला याच ठिकाणी रिसेप्शन पार पडेल. लग्नाला देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आकाश अंबानी
मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांना तीन मुलं आहेत. आकाश हा त्यांचा सर्वात मोठा मुलगा असून ईशा ही त्याची जुळी बहिण आहे. तर अनंत अंबानी हा त्यांचा सर्वात लहान मुलगा आहे. आकाश अंबानी हा रिलायन्स जिओ ग्रुपमध्ये मुख्य रणनीतीकार आहे. आकाशने अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. आकाशला लहानपणी क्रिकेटर व्हायचं होतं. तो आयपीएलची मुंबई इंडियन्स संघ आणि फुटबॉल लीग आयएसएलशी पण जोडलेला आहे.
श्लोका मेहता
श्लोका मेहता हिरे व्यापारी रसल मेहता यांची धाकटी कन्या आहे. श्लोकाने अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधून मानवशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. शिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्समधून कायद्याची मास्टर पदवीही तिने प्राप्त केली आहे. सध्या ती रोझी ब्लू फाऊंडेशन सामाजिक आणि पर्यावरण विभागात काम करत आहे. आकाश आणि श्लोका यांच्यात लहानपणापासून मैत्री आहे. त्यांनी शालेय शिक्षण एकत्र पूर्ण केलं होतं.
मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाची तारीख जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Feb 2019 07:53 AM (IST)
हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहतासोबत 9 मार्च रोजी आकाश विवाहबंधनात अडकणार आहे. मागील वर्षी आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा झाला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -