मुंबई: टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एम.एस.धोनीच्या जीवनावर आधारीत 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा 30 सप्टेंबर रिलीज होत आहे. पण या सिनेमासाठी तब्बल 60 देशात 4500 स्क्रिन बुक झाले आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि फॉक्स स्टार स्टूडीओचे सीईओ विजय सिंह यांनी याबाबतची माहिती दिली.


''एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा संपूर्ण जगात एकाच दिवशी रिलीज होतो आहे. विशेष म्हणजे, तमिळ आणि तेलगू भाषिक राज्यातील सर्वाधिक चित्रपटगृहात हा सिनेमा रिलीज होणारा हा पहिला चित्रपट आहे'' असे ते यावेळी म्हणाले.  या चित्रपटाच्या प्रिंटची जगातील चित्रपटगृह चालकांकडूनही मोठी मागणी होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

त्यामुळे भारतातील सर्वच भाषेत रिलीज करण्याचे या आधीच जाहीर केल्याप्रमाणे, तसेच चित्रपट रिलीजच्या तारखेमुळे हा चित्रपट पंजाबी आणि मराठी भाषेत रिलीज करणे शक्य झाले नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

सिनेमाचे ट्रेलर पाहा



संबंधित बातम्या

क्रिकेटपटू बायोपिकसाठी पात्र नाहीत, धोनीवरील चित्रपटावर गंभीरची नाराजी

विराट कोहली ‘या’ तीन सिनेमांची आतुरतेने वाट पाहतोय!

धोनीसारखी फटकेबाजी करताना जखमी झालेला सुशांत सिंह तंदुरुस्त