Mrunal Dusanis : मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. 'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकेच्या माध्यमातून मृणाल घराघरांत पोहोचली आहे. पण आता मृणालने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून घरी छोटा पाहुणा येणार असल्याची माहिती दिली आहे. 


मृणालने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत लहान बाळाचे कपडे, शूज आणि एक टेडी बिअर दिसतो आहे. लहान बाळाच्या कपड्यांवर कमिंग सून असे लिहिलेले आहे. फोटो शेअर करत मृणालने कॅप्शन लिहिले आहे,"आम्ही ठरवलंय की आता झोपायचं नाही, स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि स्वच्छ घरात राहायचं आहे. आमचा आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे".





मृणाल सध्या तिच्या पतीसोबत अमेरिकेत आहे. ती 2016 साली नीरज पंडीत सोबत लग्नबंधनात अडकली होती. मृणालने नीरजसोबत अरेंज मॅरेज केले होते. नीरज हा  सॉफ्टवेअर इंजीनीअर आहे. मृणालच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू, ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती


Ghoomer : अभिषेक बच्चनने वाढदिवसानिमित्त 'घूमर' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात


One hour special episode : येत्या रविवारी रंगणार 'या' दोन मालिकांचे एक तासाचे विशेष भाग


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha