Mr And Mrs Mahi : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) आगामी 'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. नुकतेच निर्मिती संस्थेने आगामी  'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाची घोषणा केली आहे. 


सिनेमाचे पोस्टर धर्मा प्रॉडक्शनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत कॅप्शन लिहिली आहे,"स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत त्यासोबत सामना जिंकण्यासाठीदेखील आम्ही तयार आहोत". 'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमा 7 ऑक्टोबर 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.





राजकुमार रावने सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे, "तुम्ही एकटे तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकत नाही. शरण शर्मा दिग्दर्शित जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमासाठी मी उत्सुक आहे". जान्हवी कपूरनेदेखील सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. 


'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमा 7 ऑक्टोबर 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये सिनेमा क्रिकेटवर भाष्य करणारा असेल, असे दिसते आहे. 'रुही' सिनेमानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूर पुन्हा एकदा 'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


राजकुमारचे आगामी सिनेमे
 
राजकुमार राव नुकताच पत्रलेखासोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. राजकुमार रावचे अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. राजकुमार लवकरच हंसल मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्वागत' सिनेमात दिसणार आहे. तसेच हर्षवर्धन कुलकर्णींच्या आगामी 'बधाई दो' सिनेमातदेखील भूमी पेडनेकरसोबत दिसणार आहे. 'हिट', 'सेकंड इंनिंग्स', 'लाइफ इन अ मेट्रो सीक्वल' आणि 'भीड' हे राजकुमारचे आगामी सिनेमे आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha