Jacqueline Fernandez Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीनला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 


जॅकलीनला याआधी 12 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण काही कारणांमुळे जॅकलीन आज न्यायालयात जाऊ शकली नाही. त्यामुळे तिला आता 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी दिलं आहे.




जॅकलीन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरण नक्की काय आहे? 


अंमलबजावणी संचालनालयाच्या दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आणि हा पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.


सुकेशनं जॅकलीनला दिली महागडे गिफ्ट्स


सुकेशनं पाच जनावरं जॅकलिनला भेट म्हणून दिल्याचं समोर आलं आहे. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलिनला सुकेशनं महागडी ज्वेलरी देखील भेट म्हणून दिली आहे. या कलेक्शनमध्ये 15 लाखांच्या इअरिंग्सचा (कानातले) समावेश आहे. तसेच दोन डायमंड इअरिंग्स, कार्टियर बांगड्या आणि टिफनी ब्रेसलेट देखील जॅकलिनला सुकेशनं दिले.


जॅकलीनचे अनेक प्रोजोक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. तिला 'रामसेतू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जॅकलीनसह नुसरत भरुचा आणि अक्षय कुमारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Jacqueline Fernandez : 'नोरा फतेही साक्षीदार मग मी आरोपी का?' जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल


Jacqueline Fernandez : "मी माझ्या कष्टाने संपत्ती कमावली"; मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसचं स्पष्टीकरण