Money Laundering Case : सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. या प्रकरणी ED ने काल अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आज अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) या प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. या आधीही दोन्ही अभिनेत्रींची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याकडून करण्यात आलेल्या 200 कोटी रुपये वसुली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी सध्या ईडीच्या रिमांडमध्ये आहेत. काल नोरा फतेहीला या दोघांच्या समोर आणण्यात आलं होतं. आज जॅकलिन फर्नांडिसलाही या दोघांच्या समोर आणलं जाण्याची शक्यत आहे.
सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसला साक्षीदार बनवण्यात येणार असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या या दोघांचीही चौकशी सुरु असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका उद्योगपतीच्या पत्नीकडून 200 कोटींची वसुली केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या प्रकरणी सुकेशची पत्नी लीना पॉलचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. याच प्रकरणात जॅकलीनची आणि नोरा फतेहीची चौकशी सुरु आहे. नोरा आणि जॅकलीनकडे PMLA अॅक्ट अंतर्गत चौकशी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :