गायक मिका सिंहविरोधात विनयभंगाची तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 02:36 AM (IST)
मुंबई : प्रसिद्ध गायक मिका सिंह पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एकामॉडेल आणि फॅशन डिझायनर असलेल्या एका महिलेने मिका सिंहविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार केली असून पोलिस तपास करत आहेत. मिका सिंहकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेली असता मिका सिंहने गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्याआधी या महिलेने मिका सिंहच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घालता. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांसमोरच तिचा गोंधळ सुरु होता. यानंतर महिला कॉन्स्टेबलने तक्रारदार महिलेला बाहेर काढलं. दरम्यान, मिका सिंहनेही वर्सोवा पोलिस ठाण्यात संबधित मॉडेलने धमकी देऊन 5 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.