मुंबई: एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने एप्रिल महिन्यात 25 वर्ष लहान गर्लफ्रेण्ड अंकिता कोवरसोबत लगीनगाठ बांधली. दोघांनी अलिबागमध्ये लग्न केलं. मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. नवविवाहित जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर अनेक लाईक्स मिळवतात. मिलिंद आणि अंकिताची वाढती लोकप्रियता पाहून, त्यांना हिंदीतील बहुचर्चित बिग बॉस-12 ची ऑफर देण्यात आली आहे. कलर्स वाहिनीने त्यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे.

कलर्सने बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली असताना, अद्याप मिलिंद आणि अंकिताने आपला निर्णय कळवलेला नाही. जर हे 'पॉवर कपल' बिग बॉसमध्ये सहभागी झालं, तर त्याचा फायदा नक्कीच टीआरपीच्या रुपात कलर्स वाहिनीला होईल.

नुकतंच मिलिंद-अंकिताने स्पेनमध्ये फोटोशूट केलं. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर हे दोघांचं पहिलंच फोटोशूट होतं. लेदर ट्रॅव्हल अक्सेसरीज ब्रँडसाठी हे फोटोशूट होतं.

मिलिंद सोमण आणि अंकिताच्या लग्नातील खास फोटो

मिलिंदचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी 2006 मध्ये त्याने त्याची फ्रेंच को-स्टार मॅलेन जॅम्पनोईसोबत लग्न केलं होतं. परंतु 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

मिलिंदचं वय 52 वर्ष असून त्याची सध्याची बायको त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. मिलिंदचं हे दुसरं लग्न आहे. त्याआधी 2006 मध्ये त्याने त्याची फ्रेंच को-स्टार मॅलेन जॅम्पनोईसोबत लग्न केलं होतं. परंतु 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर मिलिंद सोमण अभिनेत्री शहाना गोस्वामीला डेट करत होता. सहाना मिलिंदपेक्षा 21 वर्षांनी लहान होती. त्या दोघांचं नातं चार वर्ष टिकलं.

1995 मध्ये अलिशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' या म्युझिक व्हिडीओमधील त्याचा परफॉर्मन्स अतिशय गाजला होता. न्यूड पोज देणारा पहिला भारतीय, अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडमधील त्याचं करिअर फार खास नाही. त्याने 16 डिसेंबर, रुल्‍स: प्‍यार का सुपरहिट फॉर्मूला, भ्रम, से सलाम इंडिया, भेजा फ्राय आणि बाजीवर-मस्तानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर सैफ अली खानच्या शेफ चित्रपटात तो अखेरचा दिसला होता.

फिटनेसमधून वेळ काढून मिलिंद सोमणने काही चित्रपट आणि टीव्ही शो केले आहेत. मराठी, तेलुगू, तामीळ, इंग्लिश, जपानी, जर्मन, फ्रेंच, स्वीडिश यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. एकेकाळी दूरदर्शनवर कॅप्टन व्योमची भूमिका साकारणारा मिलिंदने मलायका अरोरासह ‘इंडियाज नेक्‍स्‍ट टॉप मॉडेल’ या शोचं अँकरिंगही केलं.

संबंधित बातम्या 

लग्नानंतर पहिल्यांदाच मिलिंद-अंकिताचं फोटोशूट

मिलिंद सोमण आणि अंकिताच्या लग्नातील खास फोटो