मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने माध्यमांवर बोलताना अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचे आरोप केले होते. त्यानंतर तिने यासंदर्भात पोलिसांत तक्रारदेखील केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यासाठी पोलिसांनी अभिनेत्री आणि डान्सर डेजी शाह हिला समन्स पाठवले आहे.
याप्रकरणी पोलीस आता डेजी शाह हिच्याकडे चौकशी करणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले आहे. पुढील 2-3 दिवसांत डेजी शाह चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहणार आहे.
डेजी त्या दिवशी सेटवर होती
'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी छेडछाड केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. 2008 साली त्या गाण्याच्या चित्रीकरणाच्यावेळी डेजीदेखील सेटवर उपस्थित होती. तनुश्रीने नानांवर आरोप केल्यांनातर डेजीनेदेखील माध्यमांसमोर याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी डेजीला पोलीस ठाण्यात बोलावले आहे.
काय म्हणाली होती डेजी
डेजी म्हणाली की, तेव्हा मी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करत होते. मी तनुश्रीला काही डान्स स्टेप्स शिकवत होते. सुरुवातीचे दोन दिवस सर्व काही सुरळीत सुरु होते. परंतु तिसऱ्या दिवशी अचानक काहीतरी झाले. तनुश्री खूप धक्क्यात असल्याचे आम्ही सर्वांनी पाहिले. नेमके काय झाले होते, हे मला माहीत नाही, परंतु मी तनुश्रीच्या सोबत आहे.
#MeToo : तनुश्री-नाना वादाप्रकरणी डेजी शाहला पोलिसांचे समन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Nov 2018 11:20 AM (IST)
छेडछाडीचे आरोप करत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलीस तक्रार केली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री डेजी शाह हिला पोलीस ठाण्यात बोलावले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -