Katrina Kaif Vijay Sethupathi Merry Christmas Release Date : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) सध्या चर्चेत आहे. त्यांचा 'मेरी क्रिसमस' (Merry Christmas) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 


'मेरी क्रिसमस' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? 


कतरिनाने सोशल मीडियावर 'मेरी क्रिसमस'चं नवं पोस्टर शेअर केलं आहे. तसेच पोस्टर शेअर करत तिने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा 15 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मेरी क्रिसमस'च्या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल होत आहे. 






कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी क्रिसमस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा श्रीराम राघवन यांनी सांभाळली आहे. या बहुचर्चित सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. विजय सेतुपती लवकरच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमात झळकणार आहे. 


कतरिनाकडे सिनेमांची रांग (Katrina Kaif Movies)


बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईमध्ये आहेत. तिचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत (Salman Khan) अॅक्शन करताना दिसणार आहे. इमरान हाशमीदेखील या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तसेच शाहरुखची झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सलमानचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करेल, असे म्हटले जात आहे. तसेच शाहरुखच्या 'पठाण'चा हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


कतरिनाने नुकतचं चाळीशीत पदार्पण केलं आहे. पण तरीही आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाच्या जोरावर ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'मेरी क्रिसमस' हा सिनेमा हिंदी आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर-आलियाच्या 'अॅनिमल' (Animal) नंतर 14 दिवसांनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


Merry Christmas : 'मेरी ख्रिसमस'च्या शूटिंगला सुरुवात, विजय सेतुपती-कतरिनाची जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार!