Bollywood Actress Mayoori Kango Google : सिनेमांत (Movies) काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. सिनेसृष्टीत नशिब आजमावण्यासाठी अनेक मंडळी मायानगरी मुंबईत येतात. प्रचंड मेहनत केल्यानंतरही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. काही कलाकार चांगल्या कामाची प्रतीक्षा करतात. तर काही मात्र आपला वेगळा मार्ग निवडतात. अशाचपद्धतीत एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री मयूरी कांगो (Mayoori Kango) आज बॉलिवूड गाजवत आहे. 


बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. सिनेसृष्टीत यश मिळालेले अनेक कलाकार सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर आहेत. या यादीत अभिनेत्री मयूरी कांगोचा समावेश होतो. मयूरी एकेकाळची बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री होती. पण सध्या मात्र ती बॉलिवूडपासून दूर आहे.


महेश भट्टने लॉन्च केलेलं मयूरीला


महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या सिनेमाच्या माध्यमातून मयूरीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. महेश भट्ट यांनी मयूरीचा पहिला सिनेमा पाहिला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण या सिनेमातील मयूरीचा अभिनय मात्र महेश भट्ट यांना आवडला होता. निळ्या डोळ्याची अभिनेत्री मला माझ्या सिनेमात हवी असा महेश भट्ट यांचा हट्ट होता. त्यानंतर महेश भट्ट यांच्या सिनेमाच्या माध्यमातून मयूरी कांगोला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या सिनेमाने तिला सुपरस्टार बनवलं.


गूगलमध्ये नोकरी करतेय मयूरी


महेश भट्ट यांच्या सिनेमामुळे मयूरी कांगो बॉलिवूडची टॉप अभिनेत्री झाली. बॉलिवूड डेब्यू सुपरहिट ठरल्यामुळे मयूरी आता त्यावेळच्या आघाडीच्या सर्व अभिनेत्रींना टक्कर देणार असे म्हटले गेले. पहिल्या सिनेमामुळे रातोरात सुपरस्टार झालेल्या मयूरीला पुन्हा कधीच चांगल्या भूमिकेसाठी विचारणा झाली नाही.


मयूरीने अनेक सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. शेवटपर्यंत चांगल्या कामाची ती प्रतीक्षा करत राहिली. शेवटी तिने सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. तिने शूटिंग केलेले अनेक सिनेमे मात्र प्रदर्शित झाले नाही. त्यामुळे निराश होऊन तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. एनआरआय आदित्य ढिल्लनसोबत ती लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर न्यूयॉर्कमधून तिने मार्केटिंगमध्ये एमबीए केलं. 


मयूरी कांगो कोण आहे? (Who is Mayoori Kango)


मयूरी कांगो बॉलिवूड अभिनेत्री असून अनेक सिनेमांत तिने काम केलं आहे. 2019 पासून ती गूगलमध्ये काम करत आहे. नसीम, पापा कहते है, बेताबी, होगा प्यार की जीत, बादल, जंग, शिकारी, वामसी, जीतेंगे हम अशा अनेक कलाकृतींमध्ये तिने काम केलं आहे. तिचा अभिनयाची जादू चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.


संबंधित बातम्या


Ronit Roy Wedding : अभिनेता रोनित रॉय वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर; पत्नीसोबत लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल