मौलाना आझाद यांना सर्व समाजांमध्ये एकता नांदावी असं वाटायचं. त्यांच देशासाठी खूप मोठं योगदान होतं. या सर्व बाबी देशासमोर यायला पाहिजे म्हणून हा चित्रपट बनवण्यात आला आहे, असं 'वो जो था एक मसीहा-मौलाना आझाद' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेंद्र संजय म्हणाले. ट्रेलर लाँचींगच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 18 जानेवारी रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
खूप कमी लोकांना मौलाना आझाद यांच्या लहानपणाबद्दल त्यांच्या देशासाठीच्या योगदानांबद्दल माहीत आहे. मौलाना आझाद प्रखर आणि निष्पक्ष होते, ते धर्मापेक्षा मानवतेवर जास्त प्रभावित होते, हे मला एका संशोधनात अढळले, असे राजेंद्र संजय म्हणाले. त्यांच्या अगळ्यावेगळ्या व्यक्तीमत्वाला देशासमोर आणलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
मौलाना अबुल कलाम आझाद हे देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते. देशाला स्वतंत्र्य करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कोणताही कट न सुचवता 'यू' प्रमाणपत्र दिला आहे.
सध्या भारतात बायोपिकचं ट्रेंड सुरु आहे. नुकतंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरुन चांगलाच गदारोळ माजला होता. मात्र पहिल्याचं दिवशी या चित्रपटाने चार कोटी रुपयांची कमाई केली होती. तर लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे.
बॉलिवूडमधील गेल्या काही वर्षांत गाजलेले बायोपिक
- भाग मिल्खा भाग - धावपटू मिल्खासिंग
- एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी - क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी
- नीरजा - दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोत
- मेरी कोम - बॉक्सर मेरी कोम
- द डर्टी पिक्चर - दाक्षिणात्य स्टार सिल्क स्मिता
- पान सिंग तोमर - धावपटू पान सिंग तोमर
- बँडिट क्वीन - फूलन देवी
- दंगल - कुस्तीपटू फोगट भगिनी
- नेताजी सुभाषचंद्र बोस : अ फरगॉटन हिरो - नेताजी सुभाषचंद्र बोस
- सरबजीत - पाकिस्तानच्या तुरुंगातील भारतीय कैदी सरबजीत
- मांझी : द माऊंटन मॅन - दशरथ मांझी
- हसीना पारकर - हसीना पारकर पॅडमॅन -
- अरुणाचलम मुरुगनंथम
- संजू- संजय दत्त
आगामी बायोपिक
- तानाजी - तानाजी मालुसरे
- मणिकर्णिका - राणी लक्ष्मीबाई
- मोगल - गुलशन कुमार
- वो जो था एक मसीहा-मौलाना आझाद- मौलाना आझाद
- गली बॉईज - मुंबईतील रॅपर डिवाईन
- सुपर 30 - गणितज्ज्ञ आनंद कुमार
- केसरी - साराग्रही संग्रामातील हवलदार इशर सिंग
- बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू
- फुलराणी सायना नेहवाल
- पॉर्नस्टार शकीला
- अंतराळवीर राकेश शर्मा
मराठीमधील बायोपिक
- बालगंधर्व - बालगंधर्व
- लोकमान्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
- एक अलबेला - भगवानदादा
- ...आणि डॉ काशिनाथ घाणेकर- अभिनेते डॉ काशिनाथ घाणेकर
- प्रकाश बाबा आमटे - लोकनेते प्रकाश बाबा आमटे
- भाई- व्यक्ती की वल्ली - पु. ल. देशपांडे
- येल्लो - डाऊन सिंड्रोमग्रस्त स्विमर गौरी गाडगीळ
- ठाकरे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे