अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊण्टवर या स्पूफची व्हिडिओ लिंक शेअर केली आहे. 'अत्यंत विनोदी... नक्की पहा' असं कॅप्शन रितेशने दिलं आहे. मूळ ट्रेलरचं मराठी भाषेत आणखी विनोदी पद्धतीने डबिंग करण्यात आलं आहे. फक्त मराठीच नाही, तर पंजाबीमध्येही या ट्रेलरचं स्पूफ करण्यात आलं आहे.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील कोणे एके काळची प्रचंड हिट जोडी तब्बल 17 वर्षांनी 'टोटल धमाल' सिनेमात एकत्र झळकणार आहे. त्याशिवाय, अजय देवगन, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी, महेश मांजरेकर, जॉनी लिव्हर अशी कलाकारांची फौज या सिनेमात झळकणार आहे.
धमाल (2007) आणि डबल धमाल (2011) या सीरिजमधला हा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे इंद्र कुमार यांनीच या चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं आहे.