Marathi Movies Releasing This Week: मराठी चित्रपटांची (Marathi Movies)  प्रेक्षक उत्सुकतेने बघत असतात. आज काही मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांची टक्कर होणार आहे. त्यामुळे या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.


हरी ओम (HariOm) 
हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. श्रीहरी स्टुडीओज प्रस्तुत, हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरिओम' चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्म घेणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची ही कथा आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. हे पोस्टर पाहून हा एक अ‍ॅक्शनपट असल्याचे कळते.




'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha)


अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते, उपेंद्र लिमये  यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सूर्या यांनी केलं आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 


तू फक्त हो म्हण (Tu Fakt Ho Mhan)


मोनालिसा बागल, निखिल वैरागर, जोया खान यांची प्रमुख भूमिका असणारा तू फक्त हो म्हण हा चित्रपट देखील आज रिलीज झाला आहे. भास्कर डाबेराव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.  


धस्का (Dhaska)


'धस्का' चित्रपटाचे दिग्दर्शन सत्यवान साठे यांनी केले आहेत. तसेच  संजय कृष्णत कापसे आणि सुशांत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्यानंतर अनेक जण या चित्रपटाची वाट बघत होते. 


वाघर  आणि काटाकिर हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आज आले आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Movie Releasing This Week: मोदीजी की बेटी ते डॉक्टर जी; 'हे' चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज