मुंबई: ज्यांच्या नावावर एक लाखांहून अधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्याचा जागतिक विक्रम आहे असे मुंबईतल्या जे. जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर मराठी चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटात लहाने यांची भूमिका अभिनेते मकरंद अनासपुरे साकारत आहे, तर अलका कुबल लहानेंच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘डॉ. तात्या लहाने : अंगार पॉवर इज विदीन’ असं या चित्रपटाचं नाव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक विराग वानखेडे यांनी चक्क आपलं नेरूळचं घर विकून या सिनेमासाठी पैसे ऊभे केले आहेत.
‘चित्रपटासाठी त्याने आपले नेरूळचे घर विकून पैसा उभा केला. त्याची धडपड बघून मी चित्रपट करण्यासाठी त्याला परवानगी दिली.’ असं चित्रपटाबाबत डॉ. लहाने म्हणाले.