धुळे : ‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या बाजूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने भूमिका घेतली आहे. सिनेमा दाखवून त्यावर चर्चा घडवून आणल्या पाहिजेत, असे अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले.
‘अंनिस’ची भूमिका काय?
“अंधश्रद्धा निर्मुलन समिती दशक्रिया सिनेमाच्या बाजूने आहे. हा सिनेमा दाखवला जायला पाहिजे. त्याच्यावर चर्चा घडून आल्या पाहिजेत. यासाठी अंनिस पुढाकार घेईल.”, असे अविनाश पाटील यांनी सांगितले.
‘दशक्रिया’ला विरोध पुरोगामी परंपरेला साजेसा नाही!
“दशक्रिया सिनेमाला विरोध म्हणजे महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी, पुरोगामी परंपरेला साजेसा नाही. संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना आड येणारा हा विरोध आहे.”, असेही अविनाश पाटील म्हणाले.
‘दशक्रिया’ला कुणाचा विरोध?
पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दशक्रिया सिनेमाला विरोध दर्शवला आहे. सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून 64 वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. शुक्रवारी 17 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे
सिनेमा प्रदर्शित झाल्यास त्याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
‘दशक्रिया’ दाखवणार नाही, पुण्यातील ‘सिटी प्राईड’चा निर्णय
‘दशक्रिया’ चित्रपटाला अखिल भारतीय ब्राम्हण संघाचा विरोध
‘दशक्रिया’ प्रदर्शित व्हावा, त्यावर चर्चा व्हाव्यात : अविनाश पाटील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2017 07:31 PM (IST)
सिनेमा प्रदर्शित झाल्यास त्याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -