The Family Man 3: अभिनेते मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee)   ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फॅमिली मॅन  (The Family Man) या सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ही सीरिज अनेकांनी बिंच वॉच केली. आता या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. नुकताच मनोज वाजपेयीने एक व्हिडीओ शेअर करुन फॅमिली मॅन-3  (The Family Man 3) सीरिजच्या रिलीजची हिंट दिली आहे. या व्हिडीओला मनोज वाजपेयीने दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 


मनोज वाजपेयीने शेअर केला व्हिडीओ 


मनोज वाजपेयीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं 'फॅमिली के साथ आ रहा हूँ, स्वागत नहीं करोगे हमारा' असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी म्हणतो, 'तुम्ही सगळे कसे आहात? आत निट ऐका, या होळीला माझ्या फॅमिलीला घेऊन मी तुमच्या फॅमिलीला भेटायला येत आहे.' मनोज वाजपेयीच्या या व्हिडीओवर फॅमिली मॅन सीरिजमधील अभिनेत्री श्रेया धन्वंतरी आणि  अभिनेता शहाब अली यांनी कमेंट केली आहे. आता मनोज वाजपेयीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर होळीला फॅमिली मॅन-3 रिलीज होणार आहे, असा अंदाज प्रेक्षक लावत आहेत. 


मनोज वायपेयीनं फॅमिली मॅनच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये श्रीकांत तिवारी ही भूमिका साकारली. या सारिजमधील मनोज वायपेयीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच अभिनेता शारीब हाश्मी यानं या सीरिजमध्ये जेके तळपदे ही भूमिका साकारली. या सीरिजमधील शारीबच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 


पाहा व्हिडीओ: 






फॅमिली मॅनची स्टार कास्ट


'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वायपेयी, शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.  तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूनं प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये कोणते कलाकार असणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  फॅमिली मॅन सीरिजचा पहिला आणि दुसरा भाग अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


The Family Man 3 : 'द फॅमिली मॅन 3' ची प्रतीक्षा संपली, या वर्षाच्या अखेरीस येणार प्रेक्षकांच्या भेटीला