The Family Man 3 : मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिनेमांसोबत त्यांनी अनेक वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे. त्यांची 'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. 'द फॅमिली मॅन' चे दोन सीझन यशस्वी झाल्यानंतर प्रेक्षक 'द फॅमिली मॅन 3' (The Family Man 3) वेबसीरिजची प्रतीक्षा करत होते. आता या वेबसीरिज संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. या वर्षाच्या अखेरीस ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. 


'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनला  प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजवर सध्या काम सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. त्यामुळे प्रेक्षक आता तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीझनमध्येदेखील मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत.





'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनमध्ये  शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर दिसले होते. तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभू दिसली होती. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. संहिता पूर्ण झाल्यानंतर कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या


The Good Maharaja : 'द गुड महाराजा' लवकरच होणार प्रदर्शित, संजय दत्त दिसणार मुख्य भूमिकेत


Sher Shivraj : शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार! फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर 'शेर शिवराज' येणार रुपेरी पडद्यावर


Tehran : जॉन अब्राहमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर लाँच, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘तेहरान’


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha