मनिष आणि करण जोहर एकमेकांना डेट करत असल्याचा रिपोर्ट 'पिंकव्हिला' या बॉलिवूड वेबसाईटवर पाहायला मिळत आहे.
करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त मनिषने इन्स्टाग्रामवर दोघांचा एक फोटो शेअर केला होता. 'हॅपी हॅपी बर्थडे माझ्या प्रिय जीवलग मित्रा. येणारं वर्ष उत्तम जावो. मैत्रीची आणि एकत्र काम करण्याची 25 वर्ष... आणि अजून येणारा दीर्घ काळ आपण एकत्र असूच. तू उत्तमोत्तम चित्रपट तयार करत राहोस. आणि असाच चैतन्यमय राहा.' असं कॅप्शन मनिष मल्होत्राने दिलं आहे.
या फोटोखाली मनिषच्या चाहत्याने 'तुम्ही सगळ्यात क्यूट कपल आहात' अशी कमेंट केली आहे. विशेष म्हणजे ही कमेंट मनिषने लाईकही केली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मनिष मल्होत्राने दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना दुजोरा दिल्याचं म्हटलं जातं.
25 मे रोजी करण जोहरने 47 व्या वर्षात पदार्पण केलं, तर मनिष मल्होत्रा 51 वर्षांचा आहे.
दुसरीकडे, मनिष मात्र अशा चर्चा मूर्खपणाच्या असल्याचं म्हणतो. करण माझ्या कुटुंबाचा भाग आहे, तो मला भावासारखा आहे, अशी प्रतिक्रिया मनिष मल्होत्राने काही प्रसारमाध्यमांना दिली आहे.