Mandakini : 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. आता 26 वर्षांनंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. लवकरच ती तिचा मुलगा रब्बिल ठाकूरसोबत एका गाण्यात दिसणार आहे. 


मंदाकिनीच्या आगामी गाण्याचे दिग्दर्शन साजन अग्रवाल यांनी केले आहे. 'मा ओ मां' असे मंदाकिनीच्या आगामी गाण्याचे नाव आहे. या गाण्याच्या माध्यमातून मंदाकिनीचा मुलगा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. साजन अग्रवाल म्हणाले,"मंदाकिनीसोबत काम करण्याचे माझेही स्वप्न पूर्ण होत आहे". 


साजन अग्रवाल यांनीच 'मा ओ मां' या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर गुरुजी कैलास रायगर यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. तसेच ऋषभ गिरी यांनी हे गाणं गायले आहे. साजन अग्रवाल लवकरच एक लघुपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात मंदाकिनी मुख्य भूमिकेत असणार आहे.





मंदाकिनी म्हणाल्या, 'माँ ओ मा' हे एक सुंदर गाणं आहे. हे गाणं माझ्यासाठी नक्कीच खास आहे. कारण या गाण्यात माझा मुलगा मुख्य भूमिकेत आहे. या महिन्याच्या अखेरीच या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 


मंदाकिनीने 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर तिने 'नया कानून', 'जल', 'लडाई', 'तेजाब', 'हवालत', 'प्यार के नाम कुर्बान' आणि 'दुश्मन' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. 


संबंधित बातम्या


Dunki Movie : किंग खानचा 'डंकी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, शाहरुखने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती


Godavari : 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा भारतीय सिनेमांच्या यादीत 'गोदावरी'ला मानांकन


Jayeshbhai Jordaar Trailer : 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; 'या' दिवशी सिनेमा होणार रिलीज