Priyanka Chopra With Daughter Malti Mary : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने लाडकी लेक मालतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालतीचा आवाज ऐकू येत आहे. प्रियंकाच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांनी पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकला आहे.


प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मालती पाळण्यात बसलेली दिसत आहे. तिचा चेहरा जरी दिसत नसला तरी  हसताना आणि रडतानाचा तिचा आवाज येत आहे. प्रियांकाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,"आम्हाला सेंट्रल पार्कमध्ये जायला आवडतं". मालतीच्या या व्हिडीओमध्ये प्रियांकाचादेखील हसतानाचा आवाज येत आहे.






प्रियांकाने पहिल्यांदाच शेअर केला व्हिडीओ (Priyanka Chopra Shared Malti Mary Video)


प्रियांकाने चाहत्यांना पहिल्यांदाच मालतीचा आवाज ऐकवला आहे. तिने याआधी कधी मालतीच्या अशाप्रकारचा कोणता व्हिडीओ शेअर केला नव्हता. पाळण्यात झोपलेल्या मालतीने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले असून ती जोरजोरात पाय मारताना दिसत आहे. 


प्रियांकाच्या लेकीचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. प्रियांकाप्रमाणे तिच्या लाडक्या लेकीचादेखील मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खेळण्यांसोबत खेळतानाचे मालतीचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले होते. 


प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये आई-बाबा झाले. प्रियांकाने तिच्या लेकीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं आहे. 


प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट (Priyanka Chopra Upcoming Project)


अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येदेखील स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'सिटाडेल' नंतर प्रियांका 'जी ले जरा' (Jee Le Zaraa) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) स्क्रीन शेअर करताना दिसेल. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची झलकदेखील पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. फरहान अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.


संबंधित बातम्या


Priyanka Chopra : बाबो... 'Met Gala 2023'मधील प्रियांकाच्या लूकची चर्चा; हिऱ्याच्या नेकलेसची किंमत 204 कोटी!