Malaika Arora: बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतच्या नात्यामुळे मलायका ही चर्चेत असते. सध्या ती प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्यांदा लग्न करणार की नाही? याबाबत नुकत्याच एका मुलाखतीत मलायकानं सांगितलं.


दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या निर्णयाबाबत मलयाकानं मुलाखतीत सांगितलं, 'हो, मी याबद्दल विचार केला आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. पण मी पुन्हा लग्न केव्हा करणार याचे उत्तर मला लगेच देता येणार नाही, कारण मला काही गोष्टींबाबत सरप्राईज ठेवायचं आहे. सगळ्या गोष्टी आधी सांगितल्यानं त्यात मजा राहात नाही.' 


पुढे मलायका म्हणाली, 'मी लहान होतो तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की नातं हे रोपासारखं असतं.तुम्ही बी पेरता आणि ते वाढण्यासाठी तुम्हाला पाणी द्यावे लागतं. काही नाती वेगळी असतात. यामध्ये तुम्ही शॉर्टकटचा वापर करु शकत नाही. एकमेकांना समजून घेणे आणि त्यांचे कौतुक करणे खूप महत्वाचे आहे. हे अनेकदा आपण ते विसरतो.'


मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तिला इन्स्टाग्रामवर 17 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.  मलायका ही तिच्या वेगलवेगळ्या लूकमधील फोटो देखील शेअर करते.


1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन हे  दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.






मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Malaika Arora: मलायकाच्या एअरपोर्ट लूकची चर्चा; चार लाखांची बॅग अन् जॅकेटची किंमत तर...