Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी चर्चेत आहे. आता या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती मोठा सुगावा लागला आहे.
दिल्ली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांसह एका अल्पवयीन मुलाला सलमानला मारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता या संदर्भात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
मोहाली येथील पंजाब पोलिस मुख्यालयावर 9 मे रोजी झालेल्या आरपीजी हल्ल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन दहशतवादी आरोपींना अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला सलमानला जीवे मारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गॅंगने अल्पवयीन मुलाच्या मदतीने सलमान खानच्या हत्येची सुपारी दिली होती. यासाठी दीपक आणि मोनू डागर यांना जबाबदारी दिली होती. आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे खुलासा केला आहे की,"लॉरेन्स बिश्नोईने दीपक आणि डागरला सलमानला मारण्याचे काम सोपवले होते".
सलमान खान धमकीप्रकरण काय आहे?
सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. पत्रामध्ये 'एलबी' असा उल्लेखा होता. एलबी हा लॉरेन्स बिश्नोई असल्याचा संशय पोलीसांना होता.
संबंधित बातम्या