Desh Pehle Song: आज अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची 99 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 'मैं अटल हूं' (Main Atal Hoon) या चित्रपटातील 'देश पहले' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


'देश पहले' गाणं रिलीज (Desh Pehle Song Out)


पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. 'मैं अटल हूं' या चित्रपटात पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी 'मैं अटल हूं'  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. आता या चित्रपटामधील 'मैं अटल हूं' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पंकज त्रिपाठी यांनी हे गाणे सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,''दुनिया के सारे सुख पीछे, मेरा देश पहले।''


'देश पहले' हे गाणे जुबिन नौटियाल यांनी गायलेले गाणे,  या गाण्याचे गीतकार मनोज मुंतशिर हे आहेत तर पायल देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.






कधी रिलीज होणार 'मैं अटल हूं' ? (Main Atal Hoon Release Date)


रवी जवध यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मैं अटल हूं' हा चित्रपट पुढील वर्षी 19 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.    या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. आता पंकज त्रिपाठी यांच्या मैं अटल हूं' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  'मैं अटल हूं' या चित्रपटासोबतच पंकज हे लवकरच स्त्री 2 आणि मिर्झापूर 3 मध्ये दिसणार आहे.


'मैं अटल हूं' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट  मुंबईत पार पडला होता. यावेळी पंकज म्हणाले की, "अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे त्यांच्यासाठी सोपे काम नव्हते."


संबंधित बातम्या:


Main Atal HoonTeaser: "दलों के इस दल दल के बीच एक कमल खिलाना होगा"; 'मै अटल हूं' चा टीझर रिलीज