Mahesh Manjrekar On Battling With Cancer During Antim : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) अंतिम सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कर्करोगाचे निदान झाले होते. पण आता मांजरेकरांनी कर्करोगावर  मात केली आहे. दरम्यान या काळात मांजरेकरांनी तब्बल 35 किलो वजन कमी केले. महेश मांजरेकरांनी अंतिम सिनेमाचे  चित्रीकरण पूर्ण  केले आणि त्यानंतर पुढील उपचार घेतले होते. 


अंतिम-द फायनल ट्रुथ' (Antim - The Final Truth) सिनेमात सलमान खान (Salman Khan) पोलिसाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर आसुष शर्मा (Aayush Sharma) एका गुंडाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. महिना मकवाना (Mahima Makwana) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकताच सलमान खान आणि आयुष शर्माच्या 'अंतिम' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे ट्रेलर चॉन्च करण्याच्या कार्यक्रमात महेश मांजरेकर एकदम फिट दिसून आले होते. दरम्यान महेश मांजरेकरांनी कर्करोग आणि वजन कमी झाल्याचे कारण सांगितले. 


Antim : The Final Truth सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, 26 नोव्हेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला



मांजरेकरांची आता कर्करोगापासून झाली सुटका
महेश मांजरेकरांना अंतिम सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या काळात कर्करोग झाल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी केमोथेरपी सुरू केली. दरम्यान त्यांनी 35 किलो वजन कमी केले. आता कर्करोगापासून सुटका झाल्याने मांजरेकरांना आनंद होत आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकर केमीओथेरपी करत होते. पण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्जरी केली. आवडीचं काम करत असल्याने मांजरेकरांना शूटिंग आणि कर्करोगावर मात करणं सोपं गेलं. 


सलमान खान महेश मांजरेकरांबद्दल म्हणाला...


महेश मांजरेकरांना कर्करोग झाल्याचे कळल्यानंतर ते घाबरुन गेले नाहीत. कारण कर्करोगावर मात केलेल्यांची हिंमत महेश मांजरेकरांना माहित होती. सलमान खान म्हणाला,"अंतिम सिनेमाच्या शूटिंगच्या आधीच कर्करोग झाल्याचे महेश मांजरेकरांना कळले होते. पण त्यांनी कोणालाच त्यासंदर्भात माहिती दिली नाही".