मुंबई : बाहुबली सिनेमाच्या दोन्ही भागांनी भारतासह जगभरात तुफान कमाई केली. बॉक्स ऑफिसवरील सिनेक्षेत्राच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. मात्र बाहुबलीचा एक रेकॉर्ड महाराष्ट्राच्या जावयाने म्हणजेच अभिनेता महेश बाबूने तोडला आहे.


महेश बाबूची मुख्य भूमिका असलेला ‘भारत अने नेनू’ हा सिनेमा 20 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. तेलुगू भाषेतील हा सिनेमा 65 कोटी रुपये बजेटचा आहे. महेश बाबू आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका या सिनेमात असून, भ्रष्टाचार विषय असलेला हा एक पॉलिटिकल थ्रिलर सिनेमा आहे.

आतापर्यंत 45 देशांमध्ये सिनेमा प्रदर्शित केला असून, इतर भाषांमध्येही डब केला जाणार आहे.

या  सिनेमाने प्रदर्शनाच्या दोनच दिवसात कमाईत 125 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 48 तासात 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याचा मानही या सिनेमाने मिळवला आहे. महेश बाबूच्या करिअरमधील सर्वात यशस्वी सिनेमा म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

बाहुबली सिनेमाच्या सुरुवातीच्या बॉक्स ऑफिस गल्ल्याकडे पाहता, महेश बाबूच्या ‘भारत अने नेनू’ सिनेमाने मोठी कमाई केली आहे. आता पुढे या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरले. मात्र प्रेक्षकांची पसंती पाहता, लवकरच हा सिनेमा हिंदीत डब केला जाण्याची शक्यता आहे.



आपल्या सर्वांना माहितच असेल की, महेश बाबू हा महाराष्ट्राचा जावई आहे. अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही त्याची पत्नी आहे. नम्रताने अनेक हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केले आहे. दिवंगत अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची ती नात. 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘अस्तित्त्व’ या मराठी सिनेमात नम्रता शिरोडकरने काम केले होते.

ट्रेलर :