Maharashtracha Favourite Kon : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकार, रसिकांसाठी महत्तवाचा असणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' हा पुरस्कार सोहळा येत्या 4 डिसेंबरला रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांपासून पुरस्कार वितरणापर्यंत सर्वच गोष्टी नावीन्यतेनं नटलेल्या असतात. यंदाच्या सोहळ्याची खासियत म्हणजे यंदाचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' हा लोकप्रिय सोहळा 'सुवर्णदशक सोहळा' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयात गेल्या 10 वर्षातील दर्जेदार कलाकृतींचा गौरव केला जाणार आहे.


'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये 12 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट पॉप्युलर फेस, फेवरेट स्टाईल आयकॉन असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 


यंदाच्या सुवर्णदशक सोहळयातील नामांकनाची यादी पुढील प्रमाणे ...
सर्वोत्कृष्ट चित्रपट   
2010- (मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
2011-(मी सिंधुताई सपकाळ)
2012-(काकस्पर्श )
2013-(दुनियादारी)
2014-(लय भारी)
2015-(डॉ. प्रकाश बाबा आमटे)
2016-(सैराट)
2017-(फास्टर फेणे)
2018-(मुळशी पॅटर्न)
2019- (हिरकणी)


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक        
2010-संतोष मांजरेकर(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
2011-महेश मांजरेकर  (लालबाग परळ )
2012-महेश मांजरेकर (काकस्पर्श)
2013-संजय जाधव (दुनियादारी)
2014-निशिकांत कामत (लय भारी)
2015-परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी)
2016-नागराज मंजुळे (सैराट)
2017-अदित्य सरपोतदार (फास्टर फेणे)
2018-प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)
2019-संजय जाधव (खारी बिस्कीट)


सर्वोत्कृष्ट अभिनेता        
2010- सचिन खेडेकर(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
2011-सचिन खेडेकर(ताऱ्यांचे बेट)
2012-सचिन खेडकर(काकस्पर्श)
2013-स्वप्निल जोशी (दुनियादारी)
2014–रितेश देशमुख(लय भारी)
2015- अंकुश चौधरी  (क्लासमेट्स)
2016-आकाश ठोसर (सैराट)
2017-अमेय वाघ (फास्टर फेणे)
2018-सुबोध भावे (पुष्पक विमान)
2019-ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
2010- सोनाली कुलकर्णी (नटरंग)
2011- तेजस्विनी पंडित (मी सिंधुताई सपकाळ)
2012 - अमृता खानविलकर (झकास)
2013- सई ताम्हणकर (दुनियादारी)
2014 –केतकी माटेगावकर (टाइमपास)
2015 –मुक्ता बर्वे (डबल सीट)
2016- रिंकू राजगुरू (सैराट)
2017- सई ताम्हणकर (जाऊंद्याना बाळासाहेब)
2018- माधुरी दीक्षित (बकेट लिस्ट)
2019- सोनाली कुलकर्णी (हिरकणी)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता        
2011–सिद्धार्थ जाधव(लालबाग परळ)
2012-जितेंद्र जोशी(झकास)
2013- अंकुश चौधरी  (दुनियादारी)
2014- पुष्कर श्रोत्री (रेगे)
2015- वैभव मांगले (टाइमपास२)
2016- तानाजी गालगुंडे (सैराट)
2017- सचिन खेडेकर (मुरांबा)
2018- नागराज मंजुळे (नाळ)
2019- प्रसाद ओक (हिरकणी)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री        
2011 –विशाखा सुभेदार (मस्त चाललंय आमचं )
2012- सविता मालपेकर(काकस्पर्श)
2013- उर्मिला कानिटकर(दुनियादारी)
2014-तन्वी आझमी(लय भारी)
2015- सई ताम्हणकर (क्लासमेट्स )
2016-छाया कदम (सैराट)
2017-शिल्पा तुळसकर (बॉइज)
2018- मृणाल कुलकर्णी (ये रे ये रे पैसा)
2019- मृणाल कुलकर्णी(फत्तेशिकस्त) 


सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फेस
सोनाली कुलकर्णी
क्रांती रेडकर
केतकी माटेगावकर
सई ताम्हणकर
अमृता खानविलकर
प्रिया बापट
रिंकू राजगुरू
वैदेही परशुरामी
शिवानी सुर्वे


सर्वोत्कृष्ट स्टाईल आयकॉन
अंकुश चौधरी
अनिकेत विश्वासराव
स्वप्नील जोशी
रितेश देशमुख
आकाश ठोसर
अमेय वाघ 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha