Saurabh Chandrakar: 'महादेव बुक' ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणामुळे (Mahadev Online Gaming App) सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) चर्चेत आला आहे. नुकताच एबीपी माझाच्या हाती सौरभ चंद्राकरच्या बर्थ-डे पार्टीमधील एक फोटो आला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री  उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) दिसत आहे.

 

'महादेव बुक' ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरचा दुबईमध्ये भव्य विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात त्यानं 200 कोटी खर्च केले आहेत, असं म्हटलं जात आहे. सौरभने केवळ विवाहसोहळाच नाही तर बर्थ-डे पार्टीत देखील पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. एबीपी माझाला नुकतेच सौरभ चंद्राकरच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील एक फोटो मिळाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्राकरने 18 सप्टेंबर 2022 रोजी दुबईमध्ये वाढदिवस साजरा केला होता. या बर्थ-डे पार्टीसाठी त्यानं कोट्यवधी रुपये खर्च केले होते.

 

सौरभ चंद्राकरनं आयोजित केलेल्या भव्य बर्थ-डे पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकार, गायक आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये सेलिब्रिटींनी परफॉर्म देखील केले होते. सौरभ चंद्राकरच्या लग्नाला हजेरी लावणारे आणि परफॉर्म करणारे सेलिब्रिटीच नाही तर  त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेले लोकही  ईडीच्या रडारवर आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या सौरभ चंद्राकरच्या लग्नात त्यानं 200 कोटी खर्च केला होते त्याच्यावर आरोप आहे.

 

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग पोलिसांनी दावा केला आहे की,  सौरभचे दुर्ग येथे ज्यूस कॉर्नरचे दुकान होते. कोरोनाकाळात सौरभचे ज्यूसचे दुकान बंद झाले. तेव्हा त्यामं ऑफलाइन जुगार खेळण्यास सुरुवात केली.  नंतर त्यानं मित्र आणि सहआरोपी रवी उप्पलच्या मदतीतून तो हैदराबादमध्ये असलेल्या ऑनलाइन जुगारात आणि सट्टेबाजी  उतरला. तेथून ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सौरभ चंद्राकरने हळूहळू ऑनलाइन सट्टेबाजीचा व्यवसाय दुर्गमधून संपूर्ण देशात पसरवला आणि कोट्यवधींची कमाई केली.


सौरभ आता त्याच्या कुटुंबासह यूएईमध्ये (UAE) स्थायिक झाला आहे. पोलिसांना संशय आहे की, सौरभने 5000 कोटी या सर्व जुगार आणि गॅम्बलिंग मधून कमावलेले आहेत. 


 'महादेव बुक' ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी रणबीर कपूरला  अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी 14 बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली होती.



इतर महत्वाच्या बातम्या: