Eknath Shinde:  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.सुभेदार चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर  यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतेच 'शिवरायांचा छावा' या चित्रपटाबद्दल एक खास ट्वीट शेअर केले आहे. त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


एकनाथ शिंदे यांचे ट्वीट


एकनाथ शिंदे यांनी शिवरायांचा छावा या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'धर्मसंरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट शिवरायांचा छावा येत्या 16 फेब्रूवारी 2024 रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, निर्माते मल्हार पिचर्स आणि वैभव भोर, किशोर पाटकर तसेच संपूर्ण टीमला शुभेच्छा.'






काही दिवांपूर्वी सोशल मीडियावर मोशन पोस्टर शेअर करुन दिग्पाल लांजेकर यांनी शिवरायांचा छावा या चित्रपटाची घोषणा केली होती. या मोशन पोस्टरला त्यांनी कॅप्शन दिलं, "उजळला तेजाने, पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा.शत्रू होई परास्त,असा ज्याचा गनिमी कावा.शिवशंभूचा अवतार जणू,अवतरला ‘शिवरायांचा छावा’ 


'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind) आणि 'शेर शिवराज' (Sher Shivraj), 'सुभेदार' (Subhedar)   या   दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्यांच्या ‘शिवरायांचा छावा,’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शिवरायांचा छावा या चित्रपटात कोणकोणते कलाकार काम करणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकर यांचा  सुभेदार हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी  तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली. तर चिन्मय मांडलेकर यानं या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. 


संबंधित बातम्या:


Digpal Lanjekar : "सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा"; 'सुभेदार' च्या यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा ‘शिवरायांचा छावा!’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस