Madhuri Dixit: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचे रविवारी (12 मार्च) रोजी निधन झाले. स्नेहलता दीक्षित यांनी 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने माधुरी आणि दीक्षित कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आईच्या निधनानंतर माधुरीने एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली. माधुरीने शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी स्नेहलता दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.
माधुरीची पोस्ट
माधुरीने (Madhuri Dixit) इन्स्टाग्रामवर (Instagram) तिची आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये माधुरी ही स्नेहलता यांच्या जवळ बसलेली दिसत आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "आज सकाळी उठून पाहिलं तर आईची खोली रिकामी दिसली. हे खरं वाटत नव्हते. तिने आम्हाला आयुष्य सेलिब्रेट करायला शिकवले. ती पॉझिटिव्ह विचार करायची. तिने अनेक लोकांना खूप काही दिले. आम्हाला तिची खूप आठवण येईल. पण ती आमच्या आठवणीत कायम जिवंत राहील. आम्ही आमच्या आठवणींच्या माध्यमातून तिचे आयुष्य सेलिब्रेट करत राहू. ओम शांती ओम."
नेटकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
माधुरीच्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी स्नेहलता दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla), अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen), गायिका अलका याग्निक, अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी माधुरीनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट्स केल्या. 'त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती' अशी कमेंट अभिनेत्री जुही चावलाने माधुरीच्या पोस्टला केली.
माधुरी ही तिच्या कुटुंबासोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. माधुरीने स्नेहलता यांच्यासोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनला माधुरीने तिच्या आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक, आई स्नेहलता यांचं निधन