एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरीची आठवड्याभरात सेंच्युरी
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2016 01:37 PM (IST)
मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिकची बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग सुरु आहे. ‘धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने आठवड्याभरात 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 30 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या सिनेमाने पहिल्या आठवड्यात म्हणजे गुरुवारपर्यंत 94.13 कोटींची कमाई केली होती. पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग मिळवणाऱ्या सिनेमाला वीकडेजमध्ये मात्र त्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या वीकएंडला या बायोपिकने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दिवस – कमाई (कोटींमध्ये) शुक्र – 21.30 शनि – 20.60 रवि – 24.10 सोम – 8.51 मंगळ – 7.52 बुध – 6.60 गुरु – 5.50 शुक्र- 4.07 शनि -5.0 एकूण – 103.20