Bhool Bhulaiyaa 2 : राज्यसरकारने सिनेमागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे प्रदर्शित होण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यात बॉलिवूडच्या कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमाचादेखील समाविष्ट आहे. कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2' येत्या 25 मार्च 2022 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भूल भुलैया 2 चा टीजर प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कार्तिक आर्यनचा हा चित्रपट हॉरर-कॉमेडीचा दुहेरी संगम असेल. चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि सायनी आहूजा हे प्रमुख भूमिकेत असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. याआधी चित्रपटाचे तीन पोस्टर 19 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. कार्तिक, कियारा आणि तब्बू या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यादांच एकत्र काम करताना दिसून येणार आहेत.
कार्तिक आर्यन येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या चित्रपटावर गेले अनेक दिवस काम सुरू होते. चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनचे काम लवकरच संपणार आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत असणार आहेत.
'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिकचा हटके लूक
कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिनेमाचा टीजर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. टीजरमधील त्याचा लूक एकदमच हटके आहे. कार्तिक त्यात कळसावर बसलेला दिसून येतो. त्यात त्याने डोळ्यात काळा गॉगल घातलेला आहे. हातात आणि गळ्यात माळा घातलेल्या आहेत. जीन्स, टी-शर्ट घातलेलं आहे. त्याच्या आसपास पक्षी उडताना दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा हा हटके लूक चाहत्यांना तुफान आवडत आहे.
कियाराने शेअर केला बिहाइंड द सीन फोटो
कियाराने सोशल मीडियावर चित्रपटातील बिहाइंड द सीन फोटो शेअर केला आहे. त्यात तिने स्वत:ला मी दिग्दर्शक अभिनेत्री असल्याचे म्हटले आहे. फोटोत दिग्दर्शक अनीस बज्मी तिला सीन समजावून सांगताना दिसत आहेत.