Lata Mangeshkar last Rituals : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी सात वााजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान हे देखील लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारा दरम्यान उपस्थित होते. 


लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी शाहरुख खान स्टेजवर चढला. दरम्यान शाहरुख खानने लतादीदींसाठी दुआ मागितली. लता दीदींना श्रद्धांजली देण्याची शाहरुखची ही पद्धत अनेकांना खटकली. तर काहींनी त्याचे समर्थन केले. शाहरुख खानपूर्वी माजी क्रिकेट कर्णधार सचिन तेंडुलकर आणि त्याच्या पत्नीनेही लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.






लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदींकडून लतादीदींना आदरांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान मोदींकडून मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वन करण्यात आले. केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तर राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत यासंदर्बात माहिती दिली आहे. 


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar : पानपट्टीवाल्याकडे लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा सर्वात मोठा संग्रह, लता दीदींनी स्वत: मागवले होते रेकॉर्डिंग


Lata Mangeshkar : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लतादीदींना आदरांजली, मंगेशकर कुटुंबीयांचं केलं सांत्वन


शब्द हिरमुसले, सूर थांबले, लता मंगेशकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha