Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज (6 फेब्रुवारी) पहिली पुण्यतिथी आहे. लता दीदींना त्यांचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी आदरांजली वाहत आहेत. लता दीदींच्या गाण्यांना प्रत्येक पिढीतील लोकांची पसंती मिळते. आज (6 फेब्रुवारी) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक ट्वीट शेअर करुन लता दीदींना अभिवादन केलं आहे.
राज ठाकरे यांचे ट्वीट
राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींचं गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्यांना सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील.'
राज ठाकरे यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. संगीत दिग्दर्शक आणि निशाल ददलानीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लता दीदींना आदरांजली वाहिली आहे.
नितीन गडकरी यांनी देखील ट्विटरवर ट्वीट शेअर करुन लता दीदींच्या स्मृतीस अभिवादन केलं.
लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त कलाकार सुदर्शन पटनायक यांनी 6 फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले आहे. 'मेरी आवाज ही पहचान है' असं लिहिलेलं दिसत आहे. या वाळू शिल्पाचे फोटो ANI च्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Lata Mangeshkar: 'पिया तोसे नैना लागे रे' ते 'लग जा गले'; लता मंगेशकर यांची प्रसिद्ध गाणी