Lalita Lajmi: ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी (Lalita Lajmi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललिता या अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक गुरु दत्त (Guru Dutt) यांच्या बहीण होत्या. त्यांचे बालपण मुंबईत (Mumbai) गेले. शालेय शिक्षण दादरच्या (Dadar) किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये झाले.


17 ऑक्टोबर 1932 रोजी ललिता (Lalita Lajmi) यांचा जन्म झाला. त्यांचे यांचे काका बी.बी. बेनेगल हे कोलकाता (Kolkata) येथील कलाकार होते, त्यांनी ललिता यांना पेंट्सचा बॉक्स दिला होता.  ललिता यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. हे सामुहिक प्रदर्शन होते. त्यानंतर 1961 मध्ये ललिता या त्यांच्या चित्रांचे स्वतंत्र प्रदर्शन आयोजित करण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले पेंटिग हे 100 रुपयांमध्ये विकले गेले. हे पेंटिंग जर्मन आर्ट कलेक्टर डॉ. हेन्झमोड यांनी विकत घेतले होते. त्यांच्या चित्रांवर गुरु दत्त (Guru Dutt) , सत्यजित रे (Satyajit Ray) आणि राज कपूर (Raj Kapoor) यांनी बनवलेल्या भारतीय चित्रपटांचाही प्रभाव होता.




एका मुलाखतीत ललिता लाजमी यांनी सांगितलं होतं की, 'मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने, शास्त्रीय नृत्याच्या वर्गात मला पठवणे, हे माझ्या कुटुंबाला परवडणारे नव्हते. त्यामुळे मी स्वत:मध्ये कलेची आवड निर्माण केली. ललिता यांची मुलगी कल्पना लाजमी (Kalpana Lajmi) ही हिंदी चित्रपट दिग्दर्शका होती. 2018 मध्ये कल्पनाचं निधन झालं. 






तारे जमीन पर चित्रपटामध्ये केलं काम


ललिता लाजमी यांनी आमिर खानच्या (Aamir Khan) 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या. तारे जमीन पर (Taare Zameen Par) या चित्रपटामध्ये छोटी भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी अमोल पालेकर (Amol Palekar) यांच्या नाटकासाठी कॉस्ट्युम डिझायनिंग देखील केले होते. चेन्नईमधील अप्पा राव गॅलरी तसेच मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे त्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. बॉम्बे आर्ट सोसायटी पुरस्कार, राज्य कला प्रदर्शन पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी ललिता लाजमी (Lalita Lajmi) यांना गौरवण्यात आलं. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!