Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कुशल हा  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून  प्रेक्षकांच्या भेटीला येतो. कुशलच्या कॉमेडीच्या टायमिंगचं अनेकजण कौतुक करतात. कुशल आणि त्याची पत्नी सुनैना बद्रिके यांनी काही वर्षांपासून होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कुशलनं त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं होतं. 


होम मिनिस्टर या कार्यक्रमात आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांना कुशल बद्रिके म्हणाला, "एक चित्रपटात मी काम केलं होतं. त्या चित्रपटाचे 35 हजार रुपये मला चित्रपटाच्या निर्मात्यानं दिले नव्हते. मला पैसे मिळाले नाहीयेत हे आदेश दादाला कळालं. आदेश दादाचा मला फोन आला. तुझे पैसे अडकले आहेत का? मी त्याला हो म्हणालो. त्यानंतर तो मला म्हणाला आता तू फोन नाही करायचा, तुला फोन येईल. त्यानंतर एका तासानं मला फोन आला की, तुझे 35 हजार घेऊन जा. तेव्हा मला आदेश दादाला कसं थँक्यू म्हणू? तेच कळालं नव्हतं कारण ते 35 हजार माझ्यासाठी खूप मोठे होते. मी तेव्हा 700 रुपये पर डेमध्ये काम करत होते. ते पैसे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. खरं ते पैसे मिळाले म्हणून तेव्हा माझा संसार वाचला." हा किस्सा सांगताना कुशल भावूक झाला.


कुशलचं हे बोलणं ऐकल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले, "आपण सगळेच या क्षेत्रात मेहनत करत असतो. आपण जी मेहनत करतो, त्याचे पैसे आपल्याला मिळायला हवे"


आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. गेल्या 19 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात कुशल बद्रिकेनं त्याच्या आणि सुनैनाच्या लव्ह स्टोरीबद्दल देखील सांगितलं होतं.


कुशल हा विविध कार्यक्रम आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. कुशलच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.  रावरंभाव, पांडू या चित्रपटात देखील कुशलनं काम केलं. कुशलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 






इतर महत्वाच्या बातम्या:


Kushal Badrike : "हरवलंय हे कळल्यापासून त्रास होतोय"; कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष