KRK On Salman Khan : अभिनेता आणि चित्रपट समिक्षक कमाल राशिद खान अर्थात केआरके (KRK) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला अनेकदा तुरुंगातदेखील जावे लागले आहे. आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानची (Salman Khan) माफी मागितल्यामुळे केआरके चर्चेत आहे. 


केआरकेने ट्वीट करत सलमानची माफी मागितली आहे. केआरकेने ट्वीट केलं आहे,"माझ्या अटकेत भाईजानचा हात नसून दुसराच कोणाचा आहे. माझा गोंधळ उडाला होता. माझ्या वागण्या-बोलण्याने तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ कर सलमान. आता सलमानच्या सिनेमांचं समीक्षण न करण्याचा निर्णय मी घेतला आहे. 






केआरकेने केलं करण जौहरवर भाष्य 


केआरकेने ट्वीटमध्ये पुढे लिहिलं आहे,"माझ्या अटकेत करण जौहरचा हात असल्याचं अनेकांना वाटतं. पण माझ्या अटकेचा आणि करण जौहरचा काहीही संबंध नाही. याआधीदेखील केआरकेने ट्विट करत लिहिलं होत,"करण जौहर, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण आणि अक्षय कुमारचा माझ्या अटकेशी काहीही संबंध नाही. 






नेमकं प्रकरण काय?


केआरकेने त्याच्या युट्युब व्हिडिओमध्ये सलमानवर अनेक आरोप केले होते. ज्याचा विरोध म्हणून सलमानने केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. केआरकेने सलमानच्या 'राधे'ला निगेटिव्ह रिव्यू दिला होता. चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वीही केआरकेने चित्रपटाच्या विरुद्ध अनेक ट्वीट केले होते. केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये सलमानवर अनेक आरोप देखील केले. त्याने 'बिईंग ह्युमन फाऊंडेशन'ला खोटं सांगत पैसे उकळण्याचं एक माध्यम म्हटलं होतं. सलमानच्या कंपनी विरुद्ध चुकीची माहिती पसरवल्यामुळे सलमानने केआरकेविरुद्ध तक्रार दाखल केली.  


संबंधित बातम्या


Adipurush: 'निर्मात्यांकडून मोठी चूक...'; आदिपुरुषच्या टीझरवरही केआरकेची टीका